आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस खरेदीचा शुभारंभ:अकोट बाजारपेठेत कापसाला 9,111 रुपये भाव

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासगी कापूस खरेदीचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. मंगळवारी अकोट बाजारपेठेत कापसाला ९१११ भाव मिळाला. पहिल्याच दिवशी कापसाला चांगला भाव मिळाल्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी विक्रीचा शुभारंभ ठरला आहे.

यावेळी प्रथम कापूस आणणाऱ्या शेतकऱ्याचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. मुहूर्तावर कापूस आणणारे शेतकरी मनिष मोहन तायडे रा. पोपटखेड यांचा बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन गो. पुंडकर व शेतकरी मुरलीधर हरिचंद्र चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुहूर्तावर नंदिकेश्वर जिनिंगकडून सुनिल काळे यांनी लिलावात बोली लावून मुहूर्ताच्या कापसाला ९ हजार १११ रुपये भाव दिला. तसेच अभय प्रमोद तळोकार रा. आकोट, अरुण देवमन सपकाळ रा. खैरखेड, उषा परमानंद लोखंडे रा. आकोलखेड प्रमोद रामचंद्र खंडारे या शेतकऱ्यांनीही कापूस शेतमाल विक्री करिता आणला होता. त्यांचा बाजार समितीचे प्रशासक, निखिल गावंडे, रितेश अग्रवाल, विशाल बोरे, कुलदीप वसु, बाजार समितीचे सचिव सुधाकर दाळू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कापसाला लिलावात ७६०० पासून ९१११ पर्यंत भाव मिळाला.

यावेळी बाजार समितीचे माजी संचालक अतुल म्हैसने, कापूस व्यापारी पवन गुप्ता, प्रवीण चांडक, दीपक अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, राजू केला, किशोर लखोटिया, मुरलीधर चौधरी, विजय अग्रवाल, नवीन चांडक, धीरज चांडक, निलेश पालीवाल, रोमिल अग्रवाल, विनोद वरणकार, विजय नानोटे, प्रफुल्ल पिंपळे व बहुसंख्य शेतकरी, बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...