आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटींचा निधी:महापालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सोयी- सुविधांसाठी 9.63 कोटींचा निधी मंजूर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाकडून महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांसाठी ७ कोटी ४५ लाख आणि २ कोटी १८ लाख असा एकूण ९ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून विविध प्रभागात रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरणासह विविध ६० विकास कामे केली जाणार आहेत. या कामांना येत्या काही दिवसात प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या कामांना प्रारंभ करण्यात येईल.

राज्याच्या नगरविकास विभागाने शहरात विविध विकास कामे करण्यासाठी हा निधी मंजुर केला आहे. या अनुषंगाने विविध प्रभागात विविध विकास कामे घेतली आहेत. प्रभाग क्रमांक २,प्रभाग क्रमांक ६, प्रभाग क्रमांक ८, प्रभाग क्रमांक ९, प्रभाग क्रमांक १०, प्रभाग क्रमांक ११, प्रभाग क्रमांक १२ आणि प्रभाग क्रमांक ५, प्रभाग क्रमांक १३, प्रभाग क्रमांक १५, प्रभाग क्रमांक १८, प्रभाग क्रमांक १९

अन्य कामांचाही समावेश रस्त्याचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, नाल्याच्या बांधकामासोबतच संत तुकाराम चौकाचे राहिलेले काँक्रिटीकरण, शिवाजी पार्कचे सौंदर्यीकरण, शिवसेना वसाहतीत सामाजिक सभागृह आणि महात्मा फुले नगर भागात सभागृहाचे बांधकाम केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...