आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण‎ अपघात:दुचाकीच्या अपघातात 42‎ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू‎

अपघात‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर‎ येथील जुन्या शहरात राहणारे ४२‎ वर्षीय शेतकरी शेतात पिकाला‎ पाणी देण्यासाठी दुचाकीने होते.‎ दरम्यान मूर्तिजापूर- सोनाळा‎ मार्गावर त्यांच्यापुढे अज्ञात मोकाट‎ जनावर आडवे आले. या भीषण‎ धडकीमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू‎ झाला. ही घटना ४ जानेवारी रात्री‎ नऊ वाजताच्या सुमारास घडली.‎ याबाबत प्राप्त माहितीनुसार‎ मूर्तिजापूर येथील जुन्या शहरात‎ राहणारे नीलेश प्रभाकर ढोरे वय ४२‎ वर्षे हे सोनाळा येथील त्यांच्या‎ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी‎ घरून रात्री ९.३० च्या सुमारास‎ दुचाकी वरून शेतात पाणी‎ देण्यासाठी मोटरसायकल‎ क्र.एम.एच.३०-ए.डी.७२ ३६ वरून‎ जात होते.

सोनाळा परसोडा‎ रोडवरील नगर परिषद घणकचरा‎ व्यवस्थापनचे गेट जवळ त्यांच्या‎ मोटरसायकल समोर अज्ञात‎ जनावर आडवे आल्याने ते‎ रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे‎ त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात‎ पत्नी, ६ वर्षाची एक मुलगी ३‎ वर्षाचा एक मुलगा व आई वडील‎ असा आप्त परिवार आहे. याबाबत‎ मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात‎ नोंद करण्यात आली आहे. या‎ घटनेचा पुढील तपास शहर पोलिस‎ स्टेशनचे उपनिरीक्षक मनोहर‎ वानखडे व पोलिस कॉन्स्टेबल‎ नामदेव आडे करीत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...