आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक‎ घटना:ढाणकीत 50 वर्षीय व्यक्तीने झाडाला‎ गळफास लावून केली आत्महत्या‎

ढाणकी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड तालुक्यातील ढाणकी‎ येथे रमेश तिवसकर या ५० वर्षीय‎ व्यक्तीने झाडाला गळफास लावून‎ आत्महत्या केली. ही धक्कादायक‎ घटना सोमवारी सकाळी ६‎ वाजताच्या सुमारास राममंदिर‎ परिसरात उघडकीस आली.‎ ढाणकी शहरात रमेश तिवसकर हा‎ राहत होता. दोन वर्षापूर्वी त्याच्या‎ पत्नीचे आपतकालीन निधन झाले‎ आहे. तर २२ वर्षीय मुलगा हा रमेश‎ यांच्यापासून बऱ्याच दिवसांपासून‎ पुसद येथे मामाकडे राहतो. त्यामुळे‎ रमेश मिळेल ते मोलमजुरी करून‎ आपला उदरनिर्वाह करत असे.‎ कुटुंबापासून दूर असल्यामुळे‎ दिवसेंदिवस तो नैराश्याच्या दुनियेत‎ राहू लागला. घटनेच्या दिवशी दि.‎ ९ एप्रिलला त्याने मोल मजुरी‎ करून सायंकाळी जेवन केले‎ आणि परिसरातील राम मंदिर‎ परिसरात गळफास घेवून‎ आत्महत्या केली.‎