आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:अ. भा. मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. या वेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. अकोट महिला मराठा महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी मंजुषा देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. तेल्हारा तालुका अध्यक्षपदी विशाल पाथ्रीकर यांची नियुक्ती करण्यात आली. अकोला तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी ज्ञानेश्वर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. युवक मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भूषण तिरुख यांची नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती सोहळ्याला विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष राम मुळे , जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे , जिल्हा संघटक ॲड. अमोल सूर्यवंशी, अकोला तालुकाध्यक्ष ओमप्रकाश काळबांडे, युवक मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष आदेश अंधारे, अकोला तालुका कार्याध्यक्ष विशाल तायडे, कृष्णराव देशमुख, गजाननराव देशमुख, यश देशमुख, विकी मंगळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती कळवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...