आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची आत्महत्या:माजी सभापतीसह पंचायत समितीच्या सदस्यावर गुन्हा दाखल

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पंचायत समिती नविडणुकीसाठी पाच लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर सासरच्यांच्या जाचाला कंटाळून वविाहित महिलेने आत्महत्या केली,’ असे आरोप नातेवाइकांनी केले. त्यावरून पोलिसांनी पंचायत समितीच्या माजी सभापतीसह पंचायत समितीच्या सदस्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरळ पोलिस स्टेशन हद्दीतील मांजरी इथे घडली. जयश्री आशिष नागे ( वय २६, राहणार पैलपाडा, जि. अकोला) असे मृतक वविाहितेचे नाव आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

नंदा रामदास साबळे ( वय ४५ रा. मांजरी, अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ एप्रिल २०२१ रोजी जयश्री यांचा वविाह पैलपाडा येथील आशिष वसंतराव नागे याच्यासोबत झाला. जयश्रीचे सासरचे राजकीय क्षेत्रात आहे, सासरे वसंतराव मारोती नागे हे अकोला पंचायत समितीचे सभापती देखील राहिले आहेत. तर सासू शोभा नागे या सध्या पंचायत समिती सदस्या आहेत. वसंतराव नागे, जेठ नितीन वसंतराव नागे, सासू शोभा आणि नणंद जयश्री सुभाष खराटे असे तिच्या सासरच्यांची नाव आहेत. आरोप आहे की, सुरुवातीला सासरच्यांनी जयश्री नागे यांना चांगले वागवले. काही दविसांनंतर पती आशिष वसंतराव नागे आणि सासरचे मंडळींनी तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली, दरम्यान, गेल्या काही दविसांपासून जयश्री यांना नविडणुकीसाठी ५ लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी तगादा लावला होता, माहेरकडील आर्थिक परिस्थिती ठीक नसतानासुद्धा जयश्री हिने २ लाख ५० हजार रुपये सासरी आणून दिले. मात्र, त्यानंतर तिचा छळ कमी होईल आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल, असे वाटले होते. परंतु, पुन्हा उर्वरित २ लाख ५० हजार रुपयांसाठी तिचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. तर पती आशिष नागे ती माहेरी गेली असतानासुद्धा पैसे आणण्यासाठी धमक्या देत होता. त्यामुळे आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप नंदा साबळे यांनी केला आहे. तशी तक्रार उरळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. या तक्रारीनुसार सासरच्यांवर ४९८ (ए), ३०४ (बी), ३०६, ५०४, ५०६, ३४ या कलमान्वये नुसार गुन्हे दाखल झाले आहेत, तरी पती आशिष याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुलगी झाली म्हणूनही छळ ः जयश्रीला १० मे रोजी मुलगी झाली, मुलगी झाली म्हणून कुटुंबीयांनी अतोनात छळ केला होता व तिला जाणीवपूर्वक त्रास देऊन जयश्री यांना पती आशिष नागे यानेसुद्धा मारहाण केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.जयश्रीने ‘पेनड्राइव्ह’मध्ये केला डाटा गोळा जयश्रीने पैलपाडा येथील सासरच्यांनी कशाप्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणाचा डाटा पेनड्राइव्हमध्ये गोळा केला आहे. आपल्या आत्महत्येस सदर आरोपीच जबाबदार असल्याचे जयश्रीने स्पष्ट म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...