आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सव:जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रंगला सोहळा; पावसाचीही हजेरी

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी पावसानेही हजेरी लावली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलिस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी अरोरा यांनी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या परिवारातील सदस्य यांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, आमदार वसंत खंडेलवाल, जि. प. सीईओ सौरभ कटियार, उपवन संरक्षक अर्जुना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, सर्व यंत्रणा प्रमुख तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे परिवारजन, शहिदांचे वीरपिता, वीरमाता, वीरपत्नी उपस्थित होते.

आयुष्यमान भारत पुरस्कार
रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. धवल भट व डॉ. दिनेश पवार यांना ३ हजार ८९० रुग्णांना लाभ दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सन २०१९-२० राष्ट्रीय स्तर परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या १६ विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन नीलेश गाडगे यांनी केले.

विविध पुरस्कारांचे वितरण
कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. महाआवास अभियान ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्कार: प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम क्रमांक-अकोट, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक-वाकोळी, द्वितीय क्रमांक माळेगाव बाजार, तृतीय क्रमांक राजुरा घाटे या गावाला देण्यात आला. राज्य पुरस्कृत आवास योजना: सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम क्रमांक- तेल्हारा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक वाकोडी, द्वितीय क्रमांक सोनोरी बोपोरी, तृतीय क्रमांक अडगाव बु.ला प्रदान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...