आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता सर्वसमावेशक असा पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्याची सूचना िजल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांना दिल्या. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील जास्त गावांचा सहभाग व्हावा, यासाठी प्रयत्न करा, असाही आदेश सभेत देण्यात आला.
जलयुक्त शिवारच्या आराखड्यातजास्त गावांचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी समितीच्या सभेत संबंधितांना दिले. उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचे चटके साेसावे लागतात. काही िठकाणी तर २-३ कि.मी.पर्यंतही पायपीट करुन पाणी आणावे लागते.
अनेक गावात तर पाणी िवकतही घ्यावे लागते. दिवसभर मुजरीसाठी राबल्यानंतर रात्री पाणी भरावे लागत असल्याचे िचत्र गतवर्षी िदसून आले हाेते. दरम्यान यंदा संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून ग्रामस्थांना िदलासा िमळावा, यासाठी जि.प.कडून आराखडा तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सभेत जलयुक्त शिवार योजनेबाबत चर्चा करण्यात आली.
या याेजनेत १० फेब्रुवारीपर्यंत सहभागी गावांची निवड करण्यात येईल. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगीता रोकडे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार ः गतवर्षी पाणीटंचाई कृती आराखड्यातील अनेक बाबी फेटाळल्या हाेत्या. परिणामी प्रत्यक्षात असल्यानंतरही काही ठिकाणी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. ग्रामीण भागात फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे स्थायी समिती सदस्य संजय अढाऊ यांनी सभेत याबाबत प्रश्न करत पाणीटंचाई कृती आराखड्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याबाबत अध्यक्षांना विनंती केली.
योजनेत सहभागासाठी मंजुरी आवश्यक ः जलयुक्त शिवार योजना ज्या गावांनी यापूर्वी राबवण्यात आली. त्यासोबतच ज्या गावांचा समावेश पोखरा पाणलोट योजनेत करण्यात आला. त्यांना वगळून नव्याने गावे घेण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मात्र खरंच आवश्यकता असलेल्या गावांनी ग्रामसभेची मंजुरी घेऊन तसा प्रस्ताव बीडीओंना सादर केल्यास त्या गावांचा समावेश योजनेत करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सभेत दिली. जिल्हा प्रशासनाला सादर हाेणार आराखडा पाणी टंचाई कृती आराखडा िजल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा िवभागाकडून िजल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे. आराखड्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाय याेजना, िनधी आदींचा समावेश राहणार आहे. आराखड्यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर पुढील कारवाई हाेणार आहे.
हे आहेत निकष ः पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा सादर करण्यासाठी काही िनकषही आहेत. त्यानुसार गत तीन वर्षात ज्या गावात पाणी टंचाई उपाय याेजनांची कामे पूर्ण झालेली आहेत, त्या गावांचा आराखड्यात समावेश शक्यताेवर समावेश करता येणार नाही, असेही िजल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.