आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नेहरू पार्क चौकात दुचाकीस्वार‎ मायलेकीला कंटेनरने उडवले‎

अकोला‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई आणि मुलगी दुचाकीने घरी जात असताना‎ भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. त्यात पंधरा वर्षीय‎ मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी‎ झाली. ही घटना नेहरु पार्क चौकात बुधवारी रात्री दहा‎ वाजताच्या सुमारास घडली.‎ संपदा तुपवणे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.‎ आई किरण (४५) आणि मुलगी संपदा (रा. पाटबंधारे‎ कार्टर) दोघी दुचाकीने ‘हॉटेल सेंटर प्लाझा’ येथील‎ महिला दिनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. रात्री दहा‎ वाजताच्या सुमारास घरी परतत असताना नेहरू पार्क‎ चौकातून वळण घेणार इतक्यातच उड्डाण पुलावरून‎ भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक‎ दिली.

त्या धडकेत मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर‎ आई गंभीर जखमी झाली. यावेळी जमावाने कंटेनर‎ चालक मोहम्मद साबान मोहम्मद कासिम (रा.मधुबन‎ बिहार) याला चांगला चोप दिला. किरण तुपवणे या‎ पाटबंधारे विभागात नोकरीला आहेत, तर मुलगी संपदा‎ दहाव्या वर्गात शिकत होती. नेहरू पार्क चौकात‎ वाहनांची गर्दी होत असताना येथे एकही वाहतूक‎ पोलिस नसतो. तसेच कंटेनर शहरात शिरला कसा?‎ त्याला पोलिसांनी का अडवले नाही? असे एक ना‎ अनेक प्रश्नांमुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर‎ शंका निर्माण होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...