आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय‎ तपासणी:चिंचोली येथे शेतकऱ्याची‎‎ गळफास घेवून आत्महत्या‎

पातूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाडेगाव येथून‎जवळ‎असलेल्या‎चिंचोली गणू‎येथील शेतकरी‎शांताराम‎मोतीराम गव्हाळे‎वय ५४ यांनी‎गळफास घेऊन‎ आत्महत्या केल्याची घटना‎ सोमवारी १० एप्रिलला उघडकीस‎ आली आहे.‎या संदर्भात पोलिस पाटील‎ सुनील अंभोरे यांनी दिलेल्या‎ माहितीनुसार चिंचोली गणू येथील‎ शेतकरी गव्हाळे यांच्याकडे जमीन‎ असून, सततची नापिकी आणि‎ अवकाळी पावसामुळे झालेले‎ पिकांचे नुकसान पाहून निराश‎ होऊन त्यांनी आत्महत्या केल्याची‎ चर्चा सुरु होती. त्यांनी त्यांच्या गट‎ नं ५५ मधील शेतात असलेल्या‎ लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास‎ घेतला.‎ त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,‎ दोन मुली असा आप्त परिवार‎ आहे. पोलिस पाटील यांनी‎ घटनेची माहिती देताच बाळापूर‎ येथील ठाणेदार अनिल जुमळे,‎ पोलिस कॉन्स्टेबल शुद्धधन‎ दाभाडे, दंदी, पोलिस पाटील‎ सुनील अंभोरे यांनी या घटनेचा‎ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय‎ तपासणीसाठी पाठवला आहे.‎