आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकीयदृष्ट्या भाजपचा गड असलेल्या अकाेल्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
पक्षाला मिळालेले नवीन पेटती धगधगती मशाल, हे चिन्ह हातात घेऊन शिवसैनिकांनी विरोधकांना सूचक संदेश दिला. शिवणी विमानतळ ते जुने शहरातील राजेश्वरापर्यंत भव्य वाहन रॅली काढण्यात आली. रॅलीत 100 पेक्षा जास्त वाहने सहभागी झाली. यात सर्वाधिक तरुणांचा माेठा सहभाग हाेता.
राज्यात झालेल्या सत्तांतरणानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे 7 नाेव्हेंबरला सकाळी प्रथमच अकाेल्यात आगमन झाले. यावेळी पश्चिम विदर्भाचे नेते खा. अरविंद सावंत, युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख तथा जि.प. गट नेते गाेपाल दातकर, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, युवा सेनेचे नेते राहुल कराळे, माजी नगरसेविका मंजुषा शेळके, गजानन चव्हाण िनतीन मिश्रा आदींचा समावेश होता.
महामार्गाला पाेलिस छावणीचे स्वरुप
शिवणी विमानतळाबाहेर आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी चार व दुचाकी वाहने घेऊन शिवसैनिक माेठ्या संख्येने जमले हाेते. या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्याने वाहने एका बाजूला उभी करणे शक्य हाेते हाेते. यािठकाणी वाहतुकीची काेंडी हाेऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस माेठ्या संख्येने तैनात करण्यात आले हाेते. यात एक उपविभागीय पोलिस अधिकारी, पाच ठाणेदारांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता.
अशी निघाली रॅली
आदित्य ठाकरे यांचे सकाळी शिवणी विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचा ताफा जुने शहराकडे िनघाला. रॅली शिवर, नेहरू पार्क, अशाेक वािटका, मदनलाल धिंग्रा चाैक (मध्यवर्ती बस स्थानक), गांधी राेड, जयहिंद चाैक मार्गाने राजेश्वर मंदिरात पाेहाेचली.
येथे झाले स्वागत
आदित्य ठाकरे यांचे नेहरु पार्कजवळ मुरली टि स्टाॅलवर स्वागत करण्यात आले. याठिकाणी अनेक वर्षांपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा ठाकरे लावण्यात आल्या आहेत येथील स्वागतनंतर ते पुढे मार्गस्थ झाले. त्यानंतर त्यांचे गांधी चाैकात स्वागत करण्यात आले. वाहनातून त्यांनी शिवसैनिक, नागिरकांना अभिवादन केले. नंतर त्यांची रॅली राजेश्वर मंदिरात पाेहाेचली. िवमानतळ ते राजेश्वर मंदिरापर्यंत पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. गांधी चाैक, सिटी काेतवाली, जयहिंद चाैक परिसरातील वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली हाेती. आदित्य ठाकरे हे राजेश्वर मंदिराजवळ पाेहाेचल्यानंतर हनुमान मंदिर ते राजेश्वरापर्यंत जाण्यासाठी मानवी साखळी करण्यात आली. मुख्यद्वारावर महिला, युवकांची हातात पेटते मशाल घेऊन व पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.