आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळी:चार वर्षाच्या चिमुकल्याला रांगोळीचे भारी वेड

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षाचं वय म्हटलं की मुलं टीव्ही, मोबाइलवरील कार्टून किंवा गेममध्ये व्यस्त दिसतात. मात्र शहरातील श्रद्धानगर ३, कौलखेड भागात राहणाऱ्या चिमुकल्या प्रसन्नने रांगोळीचा छंद जोपासला आहे. त्याचा दिवसातील बहुतांश वेळ हा देवी- देवतांच्या रांगोळ्या साकारण्यात जातो.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. त्याप्रमाणे प्रसन्न हा अगदी अडीच वर्षाचा होता तेव्हापासून पेन्सिल, कागद आणि रंगांमध्ये गुंतलेला असायचा.

आधी कागदावर स्केच काढून त्यामध्ये तासनतास रमणाऱ्या प्रसन्नला पुढे रांगोळीची आवड लागली. सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून तो रांगोळीतील बारकावे शिकतो. ते घरातील फरशीवर उतरवतो. वयाच्या अवघ्या अडीच वर्षापासून त्याने रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती. शाळेतून घरी आल्यानंतर आधी एक तास त्याचा रांगोळीत जातो. त्यानंतर इतर कामे असा नित्यनेम प्रसन्नने जपला आहे. त्याचा रंगसंगतीमध्येही अभ्यास आहे. गोल्डन, स्किन, ब्राऊन आदी कलर तो तयार करतो. कोविड काळातील टाळेबंदीत त्याने या छंदाला वेळ दिला आहे, असे त्याचे पालक सांगतात.

बातम्या आणखी आहेत...