आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:भिंतीखाली दबून मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

चांदूर बाजार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फुलगाव येथे मुसळधार पावसामुळे घराच्या मागची दरड भिंतीवर कोसळून त्यात आई व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तर राज्य सरकारकडून ४ लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. हा मदतीचा धनादेश नुकताच त्यांनी मृत मायलेकींच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.

यावेळी चांदूर बाजारचे तहसीलदार धीरज स्थूल, नायब तहसीलदार पंकज चव्हाण, दीपक भोंगाडे, राहुल म्हला, संतोष किटुकले, रणजीत देशमुख आदींसह फुलगाव येथील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...