आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भीषण अपघात:अकोल्यात होंडा सिटी आणि ट्रकची भीषण धडक, चार जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दूध पीत्या बाळासह चार वर्षीय चिमुकलीला काळाने आईपासून हिरावले

नागपूर येथून नातेवाईकांंचा साक्षीगंध आटोपून नाशिककडे निघालेल्या होंडा सिटी कारला राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील नागोली फाट्याजवळील ढाब्याजवळ भरधाव ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने कारमधील प्रवास करीत असलेल्या सात जणांपैकी चौघे जागीच झाल्याची  घटना आज (दि २०) रोजी दुपारी दीड ते दोन वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून अपघातात कारचा चिंधड्या उडाल्या, तर घटनास्थळावर रक्ताचा सडा व कारमधील साहित्य विखुरलेले दिसून येत होते. दरम्यान, कारमधील तिघे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोला येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की की, नागपूर येथून नातेवाईकांचा साक्षगंधाचा कार्यक्रम आटपून नाशिककडे निघालेल्या होंडा सिटी कार क्रमांक (एम.एच.०४- बी डब्ल्यू. ५२५९) मध्ये झाबिया हुसेन हबीब( ३० वर्षे), हुसेन गुलाम हुसेन रामपूर वाला (२६ वर्षे),गुलाम हुसेन रामपूरवाला (५५ वर्षे) फातेमा गुलाम हुसेन रामपूरवाला (५० वर्षे) बुर्‍हानुद्दीन दिलावर (२८ वर्षे),तस्निम हुसेन हबीब (४ वर्षे),बुरानोद्यीन हुसेन हबीब (५ महिने)  हे प्रवास करीत होते. या होंडा सिटी कारला अकोल्याकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेला ट्रक क्रमांक (एम.एच.एफ.व्हि.-१४१३) ने ओव्हरटेक करताना नागोली फाट्याजवळील ढाब्याजवळ समोरासमोर धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळावरील एकूण परिस्थिती व दृश्य पाहून अंगाचा थरकाप उडत होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ट्रकने एवढ्या जोरात धडक दिली की कारमधील चिमुकल्यांसह आत बसलेले काही जण रस्त्यावर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी ठाकूर,उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्यासह ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रत्नपारखी, हेड कॉन्स्टेबल मुळे, हेडकॉन्स्टेबल नवलाखे, पांडे  व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून अपघातातील जखमींना बाहेर काढले. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीररित्या जखमी झाले.

जखमींना तात्काळ मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना अकोला येथे रवाना करण्यात आले. सदर अपघात ग्रस्तांंचे नातेवाईक मूर्तिजापूर येथे आले असता त्यांनी मृत पावलेल्या चौघांची ओळख पटवली. यामध्ये ५ वर्षीय कु.तस्नीम हुसेन हबीब, बुरहानुद्दीन हुसेन हबीब ५ महिने,फातेमा गुलाम रामपूरवाले ५०, बुरहानुद्दिन दीलावर ३५ या चौघांचा समावेश असल्याचे सांगितले तर गंभीर जखमीमध्ये हुसेन गुलाम हुसेन ,गुलाम हुसेन रामपुरवाला ,झाबीया हुुुसेन हबीब या तिघांचा समावेश आहे. त्यांच्यावर अकोला येथे ह उपचार सुरू असून त्यामध्ये गुलाम हुसेन रामपुर वाला यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले.

अपघाताची माहिती मिळतात रुग्णालयात शहरातील बोहरा समाजातील समाज बांधव यांनी धाव घेतली होती.पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहे. या अपघातातील झाबीया हुसेन हबीब व त्यांची दोन चिमुकली तस्नीम हुसेन हबीब ४ वर्ष आणि बुरहानुद्दिन हुसेन हबीब वय (५ महिने )हे तिघे मुंबई येथील रहिवासी आहेत. तर गुलाम हुसेन रामपूरवाला,फातेमा गुलाम रामपूरवाला,हुसेन गुलाम हुसेन,बुरानोद्यीन दीलावर हे नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजले.सर्व आपसातील नातेवाईक असल्याचे समजले. झाबीया हुसेन हबीब या नागपूर येथे बाळंतपणा करिता आल्या होत्या.