आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे वातावरण:फत्तेपूर परिसरात बिबट्याने‎ केली वासराची शिकार‎

तिवसा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिरजगाव मोझरी परिसरात‎ बिबट्या दिसल्याची चर्चा असतानाच शुक्रवारी‎ फत्तेपूर जावरा या परिसरात दाखल होऊन या‎ बिबट्याने येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधून‎ असलेल्या वासराची शिकार केल्याची घटना घडली.‎

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले‎ आहे. फत्तेपूर येथील राजेंद्र रंगराव वाघमारे यांच्या‎ घराच्या काही अंतरावर गुरांचा गोठा असून शुक्रवारी‎ मध्यरात्री तीनच्या सुमारास बांधून असलेल्या लहान‎ वासराची बिबट्याने शिकार केल्याची घटना घडली.‎ बिबट्याने वासराची शिकार करून अर्धवट‎ खाल्लेल्या शरारीच्या हिस्स्यामुळे शनिवारी सकाळी‎ ही घटना उघडकीस आली. याबाबत तिवसा‎ वनविभागाला माहिती देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...