आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्याने शुक्रवारी काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते अकोल्यात आक्रमक झाले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक िदली. मात्र पोलिसांनी त्यांना कार्यालयात जाण्यापूर्वीच अडवले. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस - नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
केंद्रातील मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेणे सुरूच ठेवले. यापूर्वी बुधवारी रास्ता रोको व टायर जाळून निषेध नोंदवला होता. त्यानंतर शुक्रवारी गांधीरोड, पंचायत समितीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांनी त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. मात्र आंदोलकांनी नकार देत पुढे जाण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलसांनी बळाचा वापर करीत त्यांना रोखले. परिणाम आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. पोलिसांनी या सर्वांना व्हॅनमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेले.
पोलिस -नेत्यांमध्ये खडजंगी
काँग्रेसचे माजी आमदार व काही नेते जिल्हाधिकारी-निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाकडे निघाले. पोलियांनी तातडीने धाव घेत त्यांना रोखले. आम्ही केवळ मोजके नेतेच निवेदनासाठी जात असल्याचे आंदोलक म्हणाले. मात्र त्यांना पोलिसांनी रोखून धरले. यावर तुम्ही कोणाला रोखताय, का रोखताय, असे सवाल नेत्यांनी पोलिसांना केले. यारुन पोलिस व नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. अखेर काही वेळाने वाद िमटला आणि त्यांना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊ देण्यात आले. याठिकाणी नेत्यांनी िनवेदन दिले.
काँग्रेस नेत्यांच्या बदनामीचा प्रयत्न
केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांप्रती नापास झाले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या गुन्हात अडकवण्याचे काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेनदनात केला. सन 2015 मध्ये बंद झालेले नॅशनल हेराॅल्डप्रकरण पुन्हा उकरून काढून काँग्रेस नेत्यांची बदनामी करण्यात येत आहे. सन 1938मध्ये सुरू झालेले नॅशनल हेराॅल्ड हे वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या आंदाेलनाचे मुखपत्र म्हणून काम करीत हाेते. काँग्रेस नेत्यांच्या चाैकशीचा आम्ही निषेध करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.