आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची हजेरी:मूळ, हद्दवाढ भागाच्या एकत्रित विकास योजनेची हाेणार आज सभा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या मुळ तसेच हद्दवाढ भागाच्या एकत्रित विकास योजनेची सभा दोन जानेवारी २०२३ रोजी मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात होत आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १ तसेच दुपारी अडीच ते पाच या वेळेत नागरिकांना उपस्थित राहावे, असे आवाहन नगर रचना विभागाने केले आहे.

यापूर्वी मनपा, नगर रचना विकास योजना विशेष घटक पवईचे उपसंचालकांच्या सहकार्याने ५ ऑगस्टला मनपाच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला विविध क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावली होती. या अनुषंगानेच आता पुन्हा एकदा २ जानेवारी २०२३ रोजी प्रारुप विकास योजनेत नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याने विकास योजनेत प्रस्तावित करावयाचे सेवा व सुविधांची आरक्षणे तसेच प्रस्तावित रस्ते याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना या सभेत मांडाव्यात, असे आवाहन नगररचना विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...