आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिभाव:महाआरतीच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा संदेश; जयहिंद चौकात विविध मंडळांकडून महाआरती

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध एकत्रितपणे लढण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सद्भावना, सलोखा, सामाजिक समरसता, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेम अशा सर्व भावनांनी ओतप्रोत गणेशोत्सव साजरा होणे आज अपेक्षित आहे, असे प्रतिपादन आ. गोवर्धन शर्मा यांनी केले. गणेशोत्सव विसर्जन निमित्त भाजपतर्फे स्वागत तसेच भाजप कार्यालय येथील गणेश विसर्जन व महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी गणेश मंडळांकडून श्री गणेशाची महाआरती आयोजित करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा, लोककल्याणाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहाेचेल, असा विश्वास आ. वसंत खंडेलवाल यांनी व्यक्त केला. जय हिंद चौक येथे दरवर्षीप्रमाणे भाजपतर्फे श्री राजराजेश्वर, बाराभाई, जागेश्वर, खोलेश्वर गणपती मंडळ महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, भाजप प्रसिद्धिप्रमुख गिरीश जोशी, बळीराम सिरस्कार, किशोर पाटील, नाना कुलकर्णी, माधव मानकर, नीलेश निनोरे, संजय जिरापुरे, श्रीकृष्ण मोरखडे, अनिल गावंडे, किरण थोरात, अभिमन्यू नळकांडे, सुमन गावंडे, चंदा शर्मा, राम कुचके, किशोर कुचके, गणेश तायडे, हरिभाऊ काळे, विजय इंगळे, जयंत मसने, राजेश बेले, देवानंद सिरस्कार, अक्षय जोशी, संजय जोशी, पप्पू वानखडे, तुषार भिरड, श्याम विचनकर, अतुल अग्रवाल, मोहन पारधी, अॅड. देवाशिष काकड, भूषण इंदोरिया, भूषण सारसे यांनी सहभाग घेतला. भाजपतर्फे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे मंडळाचे स्वागत संतोष पांडे, अमोल गोगे, गणेश अंधारे यांनी केले तसेच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. महाआरतीच्या यशस्वितेसाठी गीता अग्रवाल, रश्मी कायंदे, सिद्धार्थ शर्मा, अॅड. ठाकूर, अशोक शर्मा, श्याम घाटे, सतीश ढगे, रमेश अल्करी, सुनीता अग्रवाल, रिता बोरा, छाया तोडसाम, चंदा शर्मा, चंदा ठाकूर, प्रणिता समरीतकर, मनीषा भुसारी, सुमन गावंडे, क्षीरसागर, पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...