आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी‎:अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन दिली अॅसिड‎ टाकण्याची धमकी; आरोपीस अटक, गुन्हा दाखल‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा येथे शाळेत जात असलेल्या‎ एका १५ वर्षीय विद्यार्थीनीचा पाठलाग‎ करुन २१ वर्षीय तरुणाने हात पकडला.‎ त्यामुळे मुलगी घाबरली व ओरडली.‎ त्यावेळी या तरुणाने मुलीला अॅसिड‎ टाकून मारुन टाकण्याची धमकी‎ दिली. ही घटना गुरूवारी २‎ फेब्रुवारीला घडली असून, मुलीने‎ दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा‎ पोलिसांनी या २१ वर्षीय तरुणाविरुद्ध‎ शुक्रवारी ३ फेब्रुवारीला गुन्हा दाखल‎ करुन त्याला तत्काळ अटक केली‎ आहे. शेख मोबीन ऊर्फ आरिफ मो.‎ मतीन (२१, रा. हबिबनगर, परतवाडा)‎ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे‎ नाव आहे. परतवाडा पोलिस‎ ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक मुलगी‎ २ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा‎ वाजताच्या सुमारास शाळेत पायी जात‎ होती.

त्यावेळी शेख मोबीन हा मुलीचा‎ पाठलाग करत तिच्या मागे आला.‎ त्यानंतर पिडीत मुलीने शाळेत परीक्षा‎ दिली व दुपारी अडीच वाजताच्या‎ सुमारास ती रस्त्याने घराकडे पायी‎ जात असताना त्याने पुन्हा मुलीचा‎ पाठलाग केला. यावेळी शेख मोबीनने‎ भर रस्त्यात तरुणीचा हात पकडला.‎ या प्रकाराने मुलगी घाबरली व जाेरात‎ ओरडली. त्यामुळे शेख मोबीनने‎ तिला त्याच ठिकाणी धमकी दिली‎ की, ओरडली तर अॅसिड टाकून‎ मारुन टाकेल. या प्रकाराने मुलगी‎ अधिकच घाबरली. या प्रकाराबाबत‎ मुलीने घरी जाऊन कुटूंबियांना‎ माहिती दिली. तक्रारीची तत्काळ‎ दखल घेवून पोलिसांनी त्याला बेड्या‎ ठोकल्या.‎

बातम्या आणखी आहेत...