आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मुलाची गळफास लावून आत्महत्या:कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पण मृत्यू मागील कारण अद्यापही अस्पष्ट

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जामठी येथील एका 25 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (03 ऑगस्ट) सायंकाळी घडली. अक्षय रमेश वानखडे असे मृत युवकाचे नाव आहे.

कुटूंबाला बसला मोठा धक्का

प्राप्त माहितीनुसार जामठी (अडसोळ) येथील युवक अक्षय रमेश वानखडे यांने बुधवारी गळफास घेतला. अक्षयच्या आई-वडीलाच्या नावे 4 एकर शेती आहे. यावर संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. युवकाने आत्महत्या का केली? या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, युवक काही दिवसांपासून चिंताग्रस्त होता. शेवटी बुधवारी त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. यामुळे संपूर्ण कुटूंबाला धक्का बसला आहे. परिसरातही प्रकरणामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आकस्मिक मृत्यूची नोंद

घटनेची माहिती मिळताच माना पोलिस ठाण्याचे एएसआय नागोलकर, कॉस्टेबल डोंगरे, इंगळे यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी कुठलिही चिठ्ठी वैगेरे आढळून आलेली नाही. त्यामुळे सदर प्रकरणी 174 कलमानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माना पोलिस करत आहे.

मूर्तिजापूरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ

मूर्तिजापूरात कंझरा रस्त्यावर राहणाऱ्या 22 वर्षीय युवकांने नुकतेच आत्महत्या केली. हा युवक मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गालगत कारंजा मार्गावर जिव्हाळा अमृततुल्य चायचे दुकान चालवीत होता. तो भाड्याच्या रूममधे राहत होता. यामागील कारण अद्याप पुढे आले नाही. यानंतर 28 जुलै रोजी ग्राम मुंगशी येथील गणेश मधुकर चव्हाण 50 वर्ष यांनी त्यांचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर पुन्हा तेवढ्यात ही घटना घडली. दरम्यानच्या काळात भागात आत्महत्येच्या प्रकरणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते आहे. यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...