आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शवविच्छेदनाला विरोध करत नातेवाइकांकडून रुग्णसेवकास मारहाण, आरोपींवर गुन्हा दाखल

मूर्तिजापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामसेवक कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. याबाबत मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्यानंतर महिलेचे शवविच्छेदन २३ रोजी करण्यात येत होते. त्यावेळी मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनी शवविच्छेदन गृहात जाऊन बाह्य रुग्ण सेवकास मारहाण केली. याबाबत मूर्तिजापूर शहर पोलिसांत दाखल तक्रारीवरून आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा व इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मूर्तिजापूर येथील ग्रामसेवक कॉलनीमधील कविता सुनील खाडे या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर महिलेचा मृतदेह येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी महिलेचे माहेरकडील नातेवाईक हिंगोली व इतर ठिकाणाहून आले.

पोलिस व डॉक्टरांच्या सांगण्यावरून दुपारी ४ वाजता बाह्य रुग्णसेवक कैलास उर्फ पुंडलिक प्रभुदास संगेले हे शवविच्छेदन करत होते. परंतु त्याच वेळेस नातेवाईक शवविच्छेदन गृहात आले व त्यांनी शवविच्छेदन करायचे नाही. जोपर्यंत मृतक महिलेचा पती हा मुलांच्या नावाने प्रॉपर्टी करून देत नाही तोपर्यंत आम्ही पीएम करू देणार नाही, असे बाह्य रुग्णसेवकाच्या अंगावर धावून गेले व त्याला मारहाण केली. यावेळी त्या ठिकाणी हजर असलेले पोलीस कॉन्स्टेबल वानखडे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही लोटपाट करून मारहाण केली. ही आरडाओरड ऐकून डॉ. विशाल यदवर व बाह्य रुग्ण सेवक संगेले यांचे सहकारी रक्षे तेथे आले.

परंतु नातेवाईक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. बाह्य रुग्णसेवक पुंडलिक संगेले यांच्या फिर्यादीवरून गणेश फाजगे रा. रिसोड, नारायण वायाळ रा. वाळूज एमआयडीसी औरंगाबाद, सागर सोळंके रा. हिंगोली, दत्ता झुंगरे रा. रिसोड यांच्या सह दोन महिला आणि अधिक ८ ते १० जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३५३, ३३२, ५०४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...