आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सपायरी डेटचे सादरीकरण:मृत्यूच्या प्लॅनिंगची खेळीमेळीतून केली मांडणी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री नटश्री नटराज प्रसन्न संस्थेकडून ‘एक्सपायरी डेट’ नाटकाचे गुरुवारी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात सादरीकरण करण्यात आले. मृत्यूचे प्लॅनिंग करण्याची कथा नाटकातून उलगडण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अकोला-अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक फेरी सुरू आहे. गुरुवारी वाशीम येथील श्री नटश्री नटराज प्रसन्न संस्थेकडून ‘एक्सपायरी डेट’ दोन अंकी नाटक आगळ्या-वेगळ्या विषयासह मांडण्यात आले. नाटकाचे लेखण चैतन्य सरदेशपांडे यांनी केले. निर्मिती प्रमुख प्रमोद जिरापुरे, दिग्दर्शक अश्विन जगताप, पार्श्वसंगीत अंकुश, नेपथ्य अश्विन जगताप, प्रकाश योजना सुयश देशपांडे, रंगभूषा अर्पित रामदेवकर, वेशभूषा गौरी गुडधे, केशभूषा प्रीती शिखरे यांची होती.

नाटकात प्रमोद चव्हाण-नाना, श्रद्धा रगडे-आई, अथर्व रगडे-राजू, सतीश शिवहरे-डॉक्टर, ऋषिकेश कामदार-मॅनेजर, वैष्णवी गाढवे-म्हातारी, हार्दिक कोटक, सूरज सौंदळे-पप्या, अजय अजिंक्य जवळेकर, शेजारी आनंद सौंदळ, अभिनव भालेराव, ऋग्वेद जगताप, रोहित जाधव, मुलगा युवराज जगताप, मुलगी अमृता राठोड, पवार काकू गायत्री गुडधे, नाडकर्णी राधा रामदेवकर, शिंदे बाई-खुशी शिखरे, शेजारी बाई मेघा बांडे, शेजारी कपिल पाटील, प्रदीप चौधरी यांनी भूमिका साकारल्या. या स्पर्धेचे समन्वयन सचिन गिरी, जय ठाकूर आणि मंदार घेवारे करत आहेत. स्पर्धेचे परीक्षक गुरू ठाकरे सोलापूर, अरविंद सावंत कल्याण आणि अशोक डाऊ नागपूर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...