आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:उभ्या ट्रकवर धडकले पोलिसांचे वाहन; 1 ठार, 2 गंभीर

गोंदिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कारवाई करून खासगी वाहनाने परत येत असताना गोंदिया शहराजवळील ढीमर टोली येथे पहाटे ४ वाजेच्या दरम्यान उभ्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात एक पोलिस कर्मचारी जागीच ठार झाला आहे तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

बुधवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी एका खासगी वाहनाने कारवाई करून परत येत होते. वाहनाला गोंदिया शहराजवळील ढीमर टोली येथे भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने विजय मानकर या पोलिस कर्मचाऱ्याच्या जागीच मृत्यू झाला, तर लुटे व कापगते हे दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना गोंदियातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंतर नागपूर येथे हलवण्यात येत आले आहे. रात्रभर कारवाई करून परत येत असताना झोपेची डुलकी लागल्याने हा अपघात घडला असून यात पोलिसांच्या वाहनाचा चुराडा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...