आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:‘सामर्थ्य’तून समर्थ सामाजिक चळवळ निर्माण होईल ः जोशी

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सामर्थ्य फाउंडेशनच्या विविध समाजसेवी उपक्रमातून आपले वेगळेपण सिद्ध केले. आगामी काळात ‘सामर्थ्य’च्या माध्यमातून समर्थ सामाजिक चळवळ निर्माण होईल,’ असा विश्वास पर्यावरण अभ्यासक्र व ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी व्यक्त केला. सामर्थ्य फाउंडेशनद्वारे टिळक पार्क येथे आयोजित पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव, तर पुरस्कार प्रायोजक चिन्मय देव, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे, स्पर्धा समन्वयक प्रवीण पळसपगार, सुर्यकांत बुडकले, प्रशांत चाळीसगांवकर यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कायदेविषयक सल्लागार ॲड. संतोष भोरे, कार्यकारिणी सदस्य श्रीराम देशपांडे, किरण चौक, दिनेश चंदन, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, सुधीर धुळधुळे, मिलिंद शनवारे, मुकुंद देशमुख आदींनी केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परीक्षक दीपक जोशी व ज्येष्ठ व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी स्पर्धकांच्या गणेशोत्सवाचे सुक्ष्मपणे निरीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. प्रथम पुरस्काराचे मानकरी संजय देशमुख ठरले, द्वितीय पुरस्कार मेघा राजुरकर, तृतीय पुरस्कार राजेंद्र सोनवणे, तर प्रोत्साहनपर पारितोषिकासाठी ऋषिकेश मिलिंद गायकवाड व शीला जोशी यांनी निवड परीक्षकांनी केली. मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटे देऊन विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत सहभागी इतर स्पर्धकांना देखील प्रमाणपत्र व रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम पुरस्कार विजेते संजय देशमुख यांनी संस्थेच्या कार्याविषयी आनंद व्यक्त करून पुरस्काराची राशी संस्थेला दान केली.

पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी त्यांनी तीन प्रोत्साहनपर पारितोषिकाची देखील घोषणा केली. संगीत वात्सल्य स्वरांगणचे अध्यक्ष सतीश खोडवे यांनी गायलेल्या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. पर्यावरणपूरक सजावटीचे अनेक कल्पक मार्ग गणेशभक्तांनी शोधले आहेत. मातीची गणेशमूर्ती व पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेतून प्रोत्साहित करण्यात आल्याचे संस्थाध्यक्ष प्रबोध देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती ॲड. संतोष भाेरे यांनी दिली. सामर्थ्य फाउंडेशन एका ध्येयाने स्थापन झाली. अल्पावधीतच त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. नदीच्या प्रवाहासारखे निरंतर सुरू असलेले संस्थेचे कार्य पुढे जाऊन समुद्रासारखे विशाल होईल. सामर्थ्यचे सामाजिक कार्य दिशादर्शक ठरणार आहे, असे मत डॉ. वसुधा देव यांनी अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अशोक सोनोन यांनी, तर आभार डॉ. गजानन वाघोडे यांनी मानले.

निसर्गाच्या सानिध्यात कार्यक्रम ः सामर्थ्य फाउंडेशनच्या पर्यावरणपूरक स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा टिळक पार्क येथे अभिनव पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या जागेत घेण्यात आला. यावेळी स्पर्धक व विजेत्यांना रोपटे वाटप करून वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. गणेशोत्सवात संस्थेच्यावतीने सार्वजनिक मंडळांनाही रोपट्यांचे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...