आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री दत्त मंदिर संस्थानतर्फे सावदा येथून बुलडाणा जिल्ह्यातील जाळीचा देव या महानुभाव संप्रदायाचे तीर्थक्षेत्रावर, पौर्णिमेनिम्मित भाविकांनी पदयात्रा काढली. बुधवारी सकाळी ७ वाजता पदयात्रा मार्गस्थ झाली. श्री कृष्ण मंदिराचे गादीपती आचार्य श्री सुरेशराज मानेकर मोठे बाबा आणि वरणगाव येथील महंत राजकुमार दादा यांचे नेतृत्वाखाली ही पदयात्रा उत्साहात रवाना झाली. बुधवारी सकाळी श्रीकृष्ण मंदिरात पहाट आरती करून या पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेत सुमारे दीडशे महिला, पुरुष, भाविक सहभागी झाले आहेत. सकाळी श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीचे पूजन अनिल महाजन आणि विद्या महाजन यांनी केले. दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ झाला. ही पदयात्रा चांगदेव, हरताळा, बोदवड, बेटावद सावळदबारा इत्यादी तीर्थक्षेत्रावर मुक्काम करून बुलडाणा जिल्ह्यातील जाळीचा देव येथे पोहोचेल. सुमारे १५० किलोमीटरचा पायी प्रवास करून ४ फेब्रुवारीला पदयात्रा जाळीचा देव येथे पोहोचेल. ५ फेब्रुवारीला यात्रा महोत्सवात देवाचे दर्शन घेऊन तेथेच मान्यवर संतांच्या उपस्थितीत पदयात्रेचा समारोप होईल. या पदयात्रेसाठी सावदा परिसरातील कोचूर, मोहराळा, वरणगाव, कर्की, वेल्हाळा येथील भाविक सहभागी झाले आहेत. पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत झाले.
आचार्य सुरेशराज मानेकर मोठे बाबा यांच्या उपस्थितीत पदयात्रा गेली. दररोज २८ किमी प्रवास सावदा ते जाळीचा देव हे अंतर १५० किलोमीटर असून दररोज २५ ते २८ किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. पाहिला मुक्काम चांगदेव, दुसरा मुक्काम बोदवड, तिसरा मुक्काम कापूसवाडी, चौथा मुक्काम नांदा तांडा, पाचवा मुक्काम सावळद बारामार्गे जाळीचा देव येथे असेल. दि. ५ रोजी पदयात्रेचा समारोप जाळीचा देव येथे केला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.