आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीरामनवमी शोभायात्रा समितीद्वारे मागील ४० वर्षांपासून श्रीरामनवमीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले जाते. गुरुवारी, ३० मार्चला आयोजित शोभायात्रेत १५१ दिंडी, देखाव्यांसह धर्मप्रेमी नागरिक सहभागी होणार असून, श्रीरामनवमनीनिमित्त सव्वालाख रुद्राक्षाचे वितरण करणार आहे. धर्म, संस्कृती, अध्यात्म, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन श्रीरामनवमी शोभायात्रेच्या निमित्ताने होते. विश्व हिंदू परिषद, श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.
शनिवारी, १८ मार्चला राणीसती धाम येथे देखावे, दिंडी समितीची बैठक आयोजित केली असून, १५१ देखावे, दिंडीचा सहभाग शोभायात्रेत राहणार आहे. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने सव्वालाख रुद्राक्षाचे वितरण गुडीपाढव्याला मुख्य चौकांमध्ये केले जाणार आहे. त्यापूर्वी सोमवारी, २० मार्चला सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिर येथे वितरण करण्यात येणाऱ्या रुद्राक्षाचे पूजन आयोजित केले आहे.
महाराणा प्रताप चौक अर्थात सीटी कोतवाली चौकात श्रीरामनवमी शोभायात्रा समितीद्वारा उभारण्यात येणाऱ्या देखाव्यांचे दरवर्षी विशेष आकर्षण असते. यावर्षीही येथे ‘कण-कण में राम'' हा देखावा उभारण्यात येणार असून, बुधवारी, २२ मार्चला सायंकाळी ५ वाजता देखाव्यांच्या स्थानाचे भूमिपूजन तर सोमवारी, २७ मार्चला सायंकाळी ५ वाजता देखाव्यांचे उद्घाटन केले जाईल. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने रविवारी, २६ मार्चला खंडेलवाल भवन येथे रामायणातील विविध प्रसंगावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दुपारी ४ ते ६ या वेळेत केले आहे.
श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रम, उपक्रम आणि शोभायात्रेत नागरिक बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा, ‘विहिंप’चे राहुल राठी, गणेश काळकर, सुरज भगेवार, प्रकाश लोढिया, सुनील पसारी, प्रकाश घोगलिया, गजानन दाळू, डॉ. अभय जैन, डॉ. प्रवीण चव्हाण हरिओम पांडे, कृष्णा शर्मा, मनीष बाछुका, नवीन गुप्ता, सुरेश कुलकर्णी, प्रताप वीरवाणी, नितीन जोशी, संदीप वाणी, नीलेश पाठक, संदीप निकम, सुरेश कुलकर्णी, सुरेंद्र जयस्वाल, सुधाकर बावस्कार, अमर कुकरेजा, आशिष भीमजियानी, कृष्णा सिसोदिया, संजय दुबे, बाळकृष्ण बिडवाई, नितीन जोशी, विलास अनासाने, किशोर पाटील, वसंत बाछुका, हेमंत सरदेशपांडे, दीपक बजाज, ज्योती टोपले, रेखाताई नालट, दुर्गा जोशी, कमला भोबळे, आशा ईचे, लक्ष्मी अकोटकर, कमला सोनटक्के, विमल नाचवणे, पुष्पा वानखेडे, साधना येवले, छाया तोडसे, संतोषी शर्मा, सारिका देशमुख, मालती रणपिसे, मनीषा भुसारी, चित्रा बापट, अश्विनी सुजदेकर यांनी केले आहे. वर्षप्रतिपदा अर्थात गुडीपाडवा ते रामनवमी या कालावधीत कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने केलेआहे. या कार्यक्रमात सहभागी होत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करावा श्रीरामनवमीला नागरिकांनी रोषणाईसह दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन श्रीरामनवमी शोभायात्रा समितीने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.