आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामलकापूर येथील गायत्री बालिकाश्रम येथे २६ जानेवारी रोजी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमामध्ये अकोला शहरातील महिला, मलकापूर येथील ५०० वर महिलांनी सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे बालिकाश्रम येथील मुलींच्या हस्ते तीळगुळ, वाण वाटप करण्यात आले. यावेळी बालिकाश्रमातील व उत्कर्ष शिशुगृहातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर गोड हास्य फुलले होते. सहभागी झालेल्या महिलांकरीता उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, दोरीवरच्या उडया, लिंबू चमचा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धामध्ये महिलांनी उत्साहाने सहभागी घेऊन पारितोषिके प्राप्त केले. कार्यक्रमाच्या वेळी बालिकाश्रम मधील मुलींनी वाणाच्या वस्तू बोर, हरभरा, उस गहु आदी साहित्यांची रांगोळी काढली.
मुलींनी काढलेल्या रांगोळया कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरले. बालिकाश्रमातील मुलींनी एकल नृत्य, सामुहिक नृत्य, प्रा. श्रद्धा देशपांडे यांनी सासु-सुनेची हास्य नाटिका सादर केली. या वेळी मुलींनी हातांनी तयार केलेल्या क्राफ्टच्या वस्तूंचे प्रदर्शन लावले. मुलींना आर्थिक व्यवहाराचे थडे मिळवण्यासाठी आनंद मेळा लावण्यात आला. बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद महिलांनी घेतला. हळदी- कुंक निमित्त बालिकांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक वस्तूंचे वाण भेट म्हणून महिलांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलींनी व आलेल्या महिलांनी गाण्यावर नृत्य करून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन गायत्री बालिकाश्रम उपाध्यक्षा. अश्विनी सुजदेकर, संचालिका मीरा जोशी, अधिक्षिका वैशाली भारसाकळे, समुपेशिका भाग्यश्री घाटे, शिक्षिका विजेयता रायपुरे, उत्कर्ष शिशुगृह अधिक्षिका प्रिति दांदळे, प्रियंका ताले, अर्चना धामाळे, योगिता कोंडावार आदींसह बालिकाश्रमातील मुलींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.