आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील माझोड येथे शेतातील विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेलेला टँकर चालकासह विहिरीत कोसळल्याची घटना सोमवारी ६ जूनला घडली होती. आधी टँकर बाहेर काढल्यानंतर पाच तासांची शोधमोहिम राबवून चालकाचा मृतदेह बाहेर काढला होता. ८ जूनला २८ फुट खोल विहीरीचा उपसा करून शेतमालकाने क्रेनच्या सहाय्याने विहीरीच्या तळाशी असलेला ट्रॅक्टर बाहेर काढला.
माझोड येथे एका शेतातील विहीरीतून पाणी भरण्यासाठी गेलेला ट्रॅंकर चालक राजू मते यांच्यासह विहिरीत कोसळला होता. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिस व पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या पथकाने मदतकार्य सुरू केले. रात्री उशीरा टँकर विहीरीबाहेर काढण्यात आल्यानंतर पाच तासाच्या शोधमोहिमेनंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. एकूण ६० फूट खोल विहीरीतून २८ फुट पाणी पातळीचा उपसा करून ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले. २८ फूट पाण्यात ट्रॅक्टरखाली दबलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढणे हे प्रचंड आव्हानात्मक कार्य असल्याचे दीपक सदाफळे यांनी सांगितले.
आव्हानात्मक शोधमोहिम
विहीरीच्या बुडात असलेल्या ट्रॅक्टरवर अंदाजे २५ फूट पाणी. त्यात विहीरीच्या बाजू कच्च्या मुरुमाच्या असल्याने क्रेनच्या कंपनाने विहिरीचे फरमे कोसळण्याची भीती होती. चालकाचा मृतदेह ट्रॅक्टरखाली असण्याची शक्यता ग्रामस्थांना होती. अशावेळी पाण्यात धैर्याने ही आव्हानात्मक शोध मोहिम राबवली गेली. वायररोप व लोखडी रॅम्पच्या सहाय्याने बुडातील ट्रॅक्टर जागेवरच उलटवण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढला हे सर्च ऑपरेशन पाण्याखाली केल्याने आव्हानात्मक ठरले, असे दीपक सदाफळे सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.