आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत अर्भक:सर्वोपचारच्या भिंतीलगत आढळले तीन दिवसांचे स्त्री जातीचे मृत अर्भक

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शुक्रवारी ४ नाेव्हेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक तीन दिवसांचे अर्भक मृतावस्थेत आढळले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

यासंदर्भात वैद्यकीय सूत्रांनुसार, सर्वोपचार रुग्णालयाच्या मेन गेटच्या बाजूला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत तीन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले आहे. परिसरातील व्यावसायिकाच्या निदर्शनास आल्यानंतर ही बाब पुढे आली. त्यानंतर पोलिस, सर्वोपचार रुग्णालयातून सुरक्षा रक्षकांना बोलावण्यात आले.

त्यानंतर डॉक्टरांनी या अर्भकास तपासले. आधी अपघात विभाग त्यानंतर शवविच्छेदन कक्षात ते नेण्यात आले. सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेले एक अर्भक उपचारादरम्यान दगावले होते. त्यास अंत्यसंस्कारासाठी पालकांकडे सोपवले होते. त्यामुळे रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात आढळलेले तेच असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सर्वोपचार रुग्णालयाच्या ‘एनआयसीयू’मध्ये उपचारादरम्यान दगावलेले एक शिशु अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडे सोपवण्यात आले होते. ते पालकच अर्भकास तेथेच टाकून गेले असावे, अशी शक्यता सर्वोपचार रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनीत वरठे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...