आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआतापर्यंत अकोला जिल्हाचे पक्षीनिरीक्षण करताना जिल्ह्यात एकूण 346 पक्ष्यांची नोंद झाली असून त्यांची वर्गवारी 70 प्रजाती कुटुंबात करण्यात येते. यातील जवळपास 188 प्रजाती निवासी पक्षी आहेत तर 158 प्रजाती स्थलांतरित पक्षी आहेत. यातील बरेच पक्षी हे हिवाळ्यात स्थलांतर करणारे आहेत तर पावसाळ्याच्या सुरवातीला व पावसाळ्यात पण हे पक्षी स्थलांतर करुन येतात, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक देवेंद्र तेलकर यांनी दिली आहे.
अकोला जिल्ह्याचा बहुतांश भूभाग जैवविविधतेने संपन्न आहे. ट्रॉपीकल ड्राय झोन,सातपुड्याच्या पर्वतरांगा, गवताळ माळरान, शुष्क पानगळीची वने, अभयारण्य या हिरवाईमुळे. तसेच नदी, धरणे, तलाव व जलाशय आदी पाणथळीच्या ठिकाणांमुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणात पक्षी आकृष्ट होऊन त्यांचा अधिवास वाढला आहे.
उत्तरेकडे सातपुड्याच्या गाविलगड पर्वतरांगांमध्ये नरनाळा, पुर्वेकडे गवताळ माळरान, दक्षिणेकडे शुष्क पानगळीची वने तर पश्चिमेकडे गवताळ माळराने व खुरट्या वनस्पतीं आहे. अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य तसेच मेळघाटच्या काही भागाशिवाय काटेपूर्णा व मोर्णा नदीसह पोपटखेड, महान, दगडपारवा, मोर्णा धरणा शिवाय बोरगाव मंजू, कापशी, कुंभारी, विझोरा, अखतवाडा शिवाय लहान लहान तलाव व जलाशय असून पाणथळीचे ठिकाण, गवताळ व खुले रानमाळ, शेतजमीन लाभले असल्याने येथे पक्ष्यांची पण विविधता दिसून येते. पक्ष्यांना योग्य अधिवास व पोषक वातावरण मिळत असल्याने भरपूर प्रमाणात पक्ष्यांमध्ये वैविध्यता पहायला मिळते. स्थलांतरन करणारे, प्रजनन स्थलांतरित करणारे आणि काही न थांबता निघून जाणारे तर काही भटक्या प्रजाती (कधीतरी दिसणारे) दूर्मीळ पक्षांच्या प्रजातींची नोंद घेतल्या गेली आहे.
राघू, मैना, हळद्या, दयाळ, सुभग, खबुतर, खाटीक, चंडोल, सुतार, हुदहुद, पोपट, घुबड, चिरक, वटवट्या, तितर, घर, गरुड, बदक, करकोचे इतर प्रजातीच्या पक्षी जिल्ह्यात येतात. यासह देशाच्या विविध राज्यातून आणि विदेशातूनही पक्षी जिल्ह्यात येतात. ही वैभवाची बाब असून भविष्यात हे वैक्षव टिकून राहण्यासाठी पक्ष्यांचे अधिवास जोपासावे असे आवाहन पक्षीमित्रांकडून करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.