आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर उलटला:पुनोतीजवळ ट्रॅक्टर उलटला; दोन जण जागीच ठार

बार्शीटाकळी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून ट्राॅलीखाली दबल्याने दाेन जण जागीच ठार झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील पुनाेती खुर्द गावाजवळ गुरुवार, १० नोव्हेंबरला रात्री १० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, १० नोव्हेंबरला रात्री ट्रॅक्टर चालक दिनेश ओंकार सावंत आणि मोहम्मद रेहान हे दोघे खडकी येथे ट्रॅक्टरने हार्डवेअरचे साहित्य घेऊन गेले. खडकीत चुरी ट्रॅक्टरमधून खाली केली. त्यानंतर बार्शीटाकळीकडे ते परत निघाले. दरम्यान पुनोती खुर्द येथे ज्युबिली गोल्डन कॉलेजजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली उलटली. यात दोन्ही कामगार ट्रॉलीखाली दबल्या गेले.

जखमी अवस्थेत त्यांना बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. दोघेही बार्शीटाकळी येथील बांधकाम व्यावसायिक फारुख खान सरफराज खान यांच्याकडे काम करत होते, अशी माहिती आहे. घटनेचा तपास बार्शीटाकळीचे ठाणेदार संजय सोळंके, पोहेकॉ गोपाल राठोड यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...