आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेन रेस्टॉरंट:अकोला रेल्वे स्टेशनवर ट्रेन रेस्टॉरंट सुरू हाेणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यातील अनेक रेल्वे स्टेशनवर ट्रेन रेस्टॉरंट सुरू झाले आहे. याच धर्तीवर अकोला रेल्वे स्थानकावर लवकरच ट्रेन रेस्टॉरंट सुरू होणार आहे. रेस्टॉरंटद्वारे स्थानिक खास पदार्थाच्या मेजवाणीसह येथील संस्कृती, इतिहास, पर्यटन आदींची ओळखं खवय्यांना करून देण्यात येणार आहे.

शनिवारी अकोला रेल्वे स्थानकाचा डीआरएम शलभ गोयल यांनी दौरा केला. या वेळी त्यांनी रेल्वे स्थानकावरील सुरु असलेले विविध कामे आणि प्रस्ताविक प्रकल्पाची माहिती घेतली. यात रेल्वे स्थानकावर सुरू होणाऱ्या ट्रेन रेस्टॉरंटचा आढावा घेण्यात आला. पुढील महिन्यापर्यंत हे रेस्टॉरंट स्थानिकांच्या, तसेच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. याशिवाय परिसरातील पार्किंग, आरोग्य केंद्र आदी काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या.

या वेळी सिनिअर डीओएम आर. के. शर्मा, सिनिअर डीपीओ एन. एस. काझी, सिनिअर डीएसटी निशांतकुमार द्विवेदी, प्रसिद्धी प्रमुख जीवन चौधरी, चिफ इंजिनिअर भुसावळ तरुण दंडोतिया, एईएन मिना, एएसटी रंजितकुमार भास्कर, स्टेशन प्रबंधक एस. डी. कवडे, तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...