आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:इनरव्हील नॉर्थच्या वतीने शहरात वृक्षारोपण अभियान;  वृक्ष हा पृथ्वीचा दागिना

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनरव्हील क्लब ऑफ अकोला नॉर्थच्या वतीने महानगरात वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. क्लबच्या महिला वर्गाने महानगरात अनेक परिसरात वृक्षारोपण करून आपले दायित्व पूर्ण करण्याचा निश्चिय बांधला आहे.

क्लबच्या अध्यक्षा दीप्ती सिकरिया यांच्या अध्यक्षतेत गोरक्षण रोड परिसरातील राधाकृष्णा पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षा अभावी पर्यावरण दूषित होऊन प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. वृक्ष हा पृथ्वीचा दागिना आहे. वृक्षावरच खऱ्या अर्थाने आपले जीवन आहे. महानगरातील पर्यावरणाचे असंतुलन बघता क्लबच्या वतीने परिसरात ५०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यात आंबा, जांबूळ, लिंब आदींचे वृक्षारोपण करण्यात आले.

झाडे ही केवळ वातावरण शुद्धच करीत नाहीत किंबहुना ती फळे देऊन आमचे आरोग्य अबाधित ठेवतात. म्हणून नागरिकांनी झाडे लावून ती जगवण्याचे आवाहन दीप्ती सिकरिया यांनी या वेळी केले. या वृक्षारोपण अभियानात क्लबच्या अध्यक्षा दीप्ती सिकरिया, सचिव काजल अग्रवाल, मुक्ता बगडीया, उमा बाजोरिया, सीमा अग्रवाल, पुष्पा सोनालावाला, ज्योती शर्मा, रेखा शुक्ला आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...