आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी शाळेत इंग्रजी झालं सोप्पं:झेडपीच्या शिक्षकाने विकसित केली अनोखी पद्धत; जॉली फोनिक्समध्ये बदल

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मातृभाषेतून इंग्रजी वाचन शिकवणारी जॉली फोनिक्स रिडिंग मेथड आता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिकवली जाणार आहे. ही मेथड विकसित करणारे जि.प. शाळा चिखलगाव येथील शिक्षक मनोजकुमार भगत यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू केला. त्या संदर्भात येत्या 30 जूनला शिक्षकांची शिक्षण परिषद आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिले आहेत.

शिक्षण परिषद 30 जूनला

मनोजकुमार भगत यांच्या मार्गदर्शनात दि. 5 व 6 एप्रिल 2022 रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून आपल्या केंद्र अंतर्गत सर्व शाळेतील सर्व शिक्षकांची शिक्षण परिषद 30 जूनला घेण्यात येणार आहे.

ध्वनीशास्त्राचा वापर

जॉली फोनिक्स रिडिंग मेथड ही ध्वनीशास्त्राचा वापर करून इंग्रजी वाचन शिकवण्याची जगप्रसिद्ध पद्धत आहे. चिखलगावचे उपक्रमशील शिक्षक मनोजकुमार भगत यांनी या मुळ पद्धतीत अपेक्षित बदल करून मराठी शाळांमध्ये मुलांना मातृभाषेतून इंग्रजी शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला. अवघ्या काही तासिकांमध्ये मुले इंग्रजी वाचायला शिकल्याने लवकरच जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळांमध्ये हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

विदेशी मेथडमध्ये केला बदल

ध्वनीशास्त्रावर अवलंबून असलेल्या मूळ विदेशी जॉली फोनिक्स रिडिंग या मेथडमध्ये इंग्रजी वर्णमालेतील 26 अक्षरे ही अनुक्रमे न शिकवता सात गटांमध्ये त्याची विभागणी करून त्याला 42 ध्वनी दिले आहेत. मात्र मुळ मेथडमध्ये भगत सर यांनी अपेक्षित बदल करून ही पद्धत सोपी केली. शिकवताना अक्षरांची सात गटात विभागणी न करता ए टू झेड ही पारंपारिक मांडणी कायम ठेवली. शिवाय मुळ पद्धतीतील 43 पैकी 23 ध्वनी त्यांनी बदलले आहेत. अल्टरनेटिव्ह ग्रुप, ट्रिकी ग्रुप अशा विविध पातळ्यांवर साऊंड आणि अ‍ॅक्शनचा मेळ साधून सोपे आणि कठीण शब्द मातृभाषेत रंजक पद्धतीने ते शिकवतात.

डी नव्हे ड

या मेथडनुसार शिकविताना उदा. d ची ओळख डी अशी न करता त्याला ड हा ध्वनी देऊन शिकवले जाते. याप्रमाणे विद्यार्थी ड+ ऑ+ ग,क+अ‍ॅ+ट असे वाचन करतात. साधे शब्द, कठीण शब्दांचा विविध पातळ्यांवर सराव करून घेतला जातो.