आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या धान्य बाजारातील अतिक्रमणाचा तिढा:87 व्यावसायिकांना 8 दिवसाची मुदत मिळताच स्वत: अतिक्रमण काढण्याची दिली लेखी हमी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना धान्य बाजारातील जागेवरील केलेले अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित 87 व्यावसायिकांना त्यांच्या विनंतीवरुन आठ दिवसाची मुदत प्रशासनाने दिली. व्यावसायिकांनी आठ दिवसात दुकानातील साहित्य काढून स्वत: अतिक्रमण काढण्याची लेखी हमी दिल्याने दिवसभर सुरू असलेला अतिक्रमणाचा तिढा सायंकाळी 5.00 वाजता सुटला.

नझुल शिट क्रमांक 39 बी, भुखंड क्रमांक 12, 54/1 आठ हजार 9/11 चौरस फुट जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. ही जागा महसुल विभागाच्या मालकीची आहे. ही जागा 1980 मध्ये लघु व्यवसायीकांना दैनंदिन शुल्क आकारण्याच्या पद्धतीने देण्यात आली होती. या ठिकाणी व्यावसायीकांनी सकाळी व्यवसाय सुरू करावा आणि सायंकाळी बंद करावा, या अटीवर ही जागा देण्यात आली होती. या जागेवर कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र 20 रुपये रोज यानुसार भाड्याने घेतलेल्या या जागेवर अनेकांनी पक्के बांधकाम केले. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित व्यावसायिकांची याचिका फेटाळली होती. या नंतर हे प्रकरण राज्य शासनाकडेही गेले. राज्य शासनाने या प्रकरणात कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे महसुल विभागाने संबंधित व्यावसायिकांनी बांधकाम करुन अटी व शर्तीचा भंग केल्याने संबंधित अतिक्रमणावर कारवाई करण्याची सुचना महापालिकेला दिली होती.

या अनुषंगाने महापालिकेचे उत्तर झोन अधिकारी विठ्ठल देवकते, नगररचना विभागाचे राजेंद्र टापरे, अतिक्रमण विभागाचे प्रविण मिश्रा, चंद्रशेखर रोकडे आदी कर्मचारी 4 नोव्हेंबरला रोजी अतिक्रमण काढण्यासाठी गेले. मात्र या 87 दुकानांपैकी बहुतांश दुकाने ही सराफा व्यावसायीकांची असल्याने अर्धा ते एक तासात दुकानातील मशिनरी तसेच साहित्य बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्हाला मौल्यवान साहित्य, वस्तु काढण्यास वेळ द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली. मात्र वेळ देण्याचा निर्णय प्रशासन घेवू शकत होते. त्यामुळे याबाबत दिवसभर चर्चा झाल्या नंतर अखेर प्रशासनाने संबंधित व्यावसायीकांना दुकानातील मौल्यवान साहित्य तसेच वस्तु काढण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी दिला. तसेच व्यावसायिकांनी तशी लेखी हमी दिली. त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले पथक सायंकाळी पाच वाजता परत आले.

या प्रकरणात भाजप, कॉग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी मध्यस्थी केली. प्रशासनाला कारवाई करण्यास या पुढाऱ्यांनी मज्जाव केला नाही. केवळ व्यावसायिकांचे मौल्यवान साहित्य काढण्यासाठी त्यांना वेळ द्यावा, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...