आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:गळफास लावून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

मानोरा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानोरा तालुक्यातील हट्टी येथील शेतकरी विष्णू उकंडा राठोड या ३५ वर्षीय युवकाने उशिरा रात्री स्वतःच्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. विष्णू राठोड यांचेकडे चार एकर शेती असून ही शेती कसण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज काही वर्षांपासून थकलेले होते. राठोड यांना एकुलती मुलगी असून घरात वृद्ध आई आहे. तसेच विष्णू राठोड यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले असून वडील उकंडा राठोड यांनी सुद्धा काही वर्षांपूर्वी बँकेकडून थकलेल्या कर्जापायी जीवन संपवल्याची माहिती वकऱ्यांकडून मिळाली.

अशातच रविवारी विष्णूने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याघटनेबाबत पोलीस स्टेशन मानोरा येथे आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. नंतर पार्थिवाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

हट्टी या गावातील कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना अडचणी येतात. त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर मृत विष्णूवर मानोरा येथेच अंतिम संस्कार करण्याची पाळी हट्टी वासियांवर आली.

बातम्या आणखी आहेत...