आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:मी नाराज नाही, शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याने अयोध्येला गेलो नाही - अब्दुल सत्तार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण अयोध्येला गेलो नाही, याचा अर्थ आपण नाराज आहोत असा होत नाही, रामाच्या बाबतीत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, मीही रामभक्तच आहे, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते अकोल्यात वादळीवारा व अवकाळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले असता सोमवारी माध्यमांशी बोलत होते.

राज्य मंत्रीमंडळातील मंत्री आणि आमदार व शिवसेनेचे नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार नव्हते. त्यावर बोलताना सत्तार म्हणाले की, देवदर्शन हे काम चुकीचे नाही. धनुष्यबाणाचे अयोध्येत पूजन केले. भक्तांवर राजकारण केल्या जात आहे हे चुकीचे आहे. मी अयोध्येला गेलो नाही, म्हणजे नाराज नाही, अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यासाठी मी दौरा काढला हे कामही अयोध्येसारखेच काम आहे. मध्यावधी निवडणुकांच्या परिस्थितीवर बोलताना पुढचे इंडीकेटर काय आहेत हे आपण सांगू शकत नाही, त्यासाठी मी मोठा पुढारी नाही, असे अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, शिवसेने़चे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, संदीप पाटील उपस्थित होते.

तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील

अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यात रविवारी अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे अकोला जिल्हा दौरावर आले होते. त्यांनी पातूर आणि बाळापूर तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. कांदा, लिंबू, फळबागा, भाजीपाला अशा सर्वच पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला व दोन ते तीन दिवसात पंचनामे करून सरकारी निकषानुसार तसेच त्यापेक्षाही अधिक मदत करता येते का, याबाबत सरकार विचार करेल असेही कृषीमंत्री म्हणाले.

पारस दुर्घटनेतील जखमीची विचारपूस

पारस येथील बाबूजी महाराज संस्थानात रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास निंबाचे झाड कोसळल्याने त्याखाली दबून सात जणांचा मृत्यू झाला होता तर 30 जण जखमी झाले होते. यावेळी जखमीच्या प्रकृतीची विचारसूपस करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सर्वोपचार रुग्णालयात आले होते. तेथे सरकारी खर्चातून उपचार केले जातील असा धीर त्यांनी जखमींना दिला.