आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील शेतमाल चोरट्यांना अटक:जनरेटर, हरभरा, तूरीवर मारला डल्ला; 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतमालसह जनरेटरची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात रविवारी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. पोलिसांनी हरभरा, तूर, गव्हासह एकूण 9 लाख 93 हजार राचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे चोरीचे गुन्हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात घडले होते.

शेतातून धान्य व अन्य साहित्य चोरी गेल्याच्या घटना अनेकदा उघडकीस येतात. आधीच नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच चोरीच्या घटनांमुळे आणखी आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालावर डल्ला मारणाऱ्या टोहीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने पातूर तालुक्यातील शिर्ला येथील गौतम उर्फ मुन्ना दिलीप इंगळे (वय ३८) याची चौकशी केली. त्याने प्रथम उडावा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्यांची पुन्हा बारकाईने चौकशी केल्यानंतर चोरीच्या गुन्हयांची उकल झाली. त्याला साथीदार करणा देवानंतर गवई (वय २८, रा. शिर्ला) यांचाही मदत झाली. त्यांनी शेतमाल, रसवंतीची मशीन व अन्य सािहत्याची चोरी गेली. पोलिसांनी चौकशीअंती मुद्देमालही जप्त केला. यात तूरीचे 29 कट्टे, गहू-17, हरभरा-35 कट्ट आणि जनरेटर, रसवंतीचे मशीन-5, डिझल इंजित-2, लोखंड कापण्याचे कटर मशीन-1 व गुन्हात वापरलेली कार (एमपी-15-सीबी-4020) हस्तगत केली. आरोपी व मुद्देमाल तपासासाठी बाळापूर पोलसांकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

.

बातम्या आणखी आहेत...