आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवठा विभाग:पश्चिम झोनमध्ये आठ ठिकाणी शोषखड्डे पूर्ण

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भूजलाची पातळी वाढवण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात शोषखड्डे तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पश्चिम झोन मध्ये एकुण आठ ठिकाणी शोषखड्ड्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात २०० शोषखड्डे केले जाणार आहेत. ज्या भागात जमनिीत मुरुम आहे, त्या भागात अधिक प्रमाणात शोषखड्डे केले जातील.

तर इतर भागात पाणी जिरण्याची शक्यता पाहून शोषखड्डे केले जातील, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. पश्चिम झोन मध्ये प्रभाग क्रमांक ९ मधील जोगळेकर प्लॉट जलकुंभ परिसर, प्रभाग क्रमांक १७ मधील हरिहरपेठ जलकुंभ परिसर, लोकमान नगर जलकुंभ परिसर, हरिहर पेठेतील ईदगाह जवळ, जिल्हा परिषद टाऊन शाळा परिसर, न्यु गुरुदेव नगर, डाबकी रोड लगत पंचमुखी हनुमान मंदिर परिसर. प्रभाग क्रमां १८ मध्ये गंगा नगर जलकुंभ परिसर असे आठ शोषखड्डे कंत्राटदार संतोष ढगे यांच्या मार्फत करण्यात आले आहे. यावेळी कनिष्ठ अभियंता तुषार टिकाईत, शैलेष चोपडे, विभागीय फिटर संतोष बडवे, व्हॉल्वमन सुधीर ढुके, मजहर खान आदी उपस्थित होते.