आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात मुबलक जलसाठा:मोर्णा, निर्गुणा, उमा ओंसडून वाहण्याची शक्यता, मध्यम प्रकल्प 100 टक्क्यांकडे

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्पात ऑगस्टच्या सुरुवातीला मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. अनेक लघु प्रकल्प ओंसडून वाहत असून मध्यम प्रकल्पाची वाटचाल 100 टक्क्यांकडे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि 24 लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पामुळे अकोला शहरासह विविध शहरांची तसेच गावांची तहान भागवतात तसेच हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या प्रारंभी जिल्हावासीयांचे लक्ष प्रकल्पाच्या जलसाठ्याकडे लागलेले असते. जून महिन्यात पावसाने दडी मारली. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.

सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी

जिल्ह्यातील सर्वात मोठे काटेपूर्णा आणि वान या दोन मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले. त्याच बरोबर पोपटखेडा टप्पा-२ आणि दगड पारवा प्रकल्पाचेही दरवाजे उघडावे लागले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी रबी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

हे प्रकल्प ओंसडून वाहण्याची शक्यता

जिल्ह्यातील मोर्णा, निर्गुणा, उमा या मध्यम प्रकल्पाची वाटचाल 100 टक्क्यांकडे सुरु आहे. उमा प्रकल्प वगळता मोर्णा आणि निर्गुणा प्रकल्पाला दरवाजे नसल्याने हे प्रकल्प जोरदार पाऊस झाल्यास ओंसडून वाहण्याची शक्यता आहे.

प्रकल्पातील जलसाठा

प्रकल्प - साठवण क्षमता - उपलब्ध साठा - टक्केवारी

  • काटेपूर्णा - 86.35 - 70.61 दलघमी - 81.81 टक्के
  • वान -- 81.95 - 54.32 दलघमी - 66.28 टक्के
  • मोर्णा - 41.46 - 34.93 दलघमी - 84.25 टक्के
  • निर्गुणा - 28.85 - 26.10 दलघमी - 90.42 टक्के
  • उमा - 11.68 - 9.79 दलघमी - 83.48 टक्के
  • दगड पारवा - 9.01 दलघमी - 83.48 टक्के
बातम्या आणखी आहेत...