आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध देऊन दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

१६ डिसेंबरला दुपारी दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक ओळखीचाच युवक भेटला, मी तुम्हाला घरी सोडून देतो. असे म्हणून त्याने दुचाकीवर बसवून दोघींनाही सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवन वाटिकेत नेले. त्यानंतर त्यांना तिथे त्याने चॉकलेट आणि कोल्ड्रिंक्स प्यायला दिले. या वेळी त्या दोघींनी कोल्ड्रिंक्स पिले आणि चॉकलेट खाल्ले. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर त्यांना गुंगी यायला लागली. तो युवक त्या दोघींनाही काटेरी झुडुपात घेऊन गेला, अन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. त्या पैकी एकाने या दोन्ही मुलींना आपल्या दुचाकी गाडीवर बसवून पवन वाटिकेकडे घेवून गेला. त्यानंतर इथे कोल्ड्रिंक्समध्ये त्याने गुंगीचे औषध देऊन दोन्ही मुलीवर अत्याचार केला आहे. यासोबतच त्याच्या साथीदाराने तिच्यावर अत्याचार केला.

बातम्या आणखी आहेत...