आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:दृष्टिबाधित महिलेवर अत्याचार;‎ आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ‎

अकाेला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दृष्टिबाधित महिलेवर तिच्या पतीसमोरच अत्याचार‎ करणाऱ्या गुलाम रसूल शेख मतीन या आरोपीची‎ पोलिस कोठडी तीन दिवसांनी वाढवण्यात आली‎ आहे. पोलिसांनी सोमवारी त्याला न्यायालयात हजर‎ केले होते.‎ ३१ मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास‎ दृष्टिबाधित महिला तिच्या पतीसह अकोला‎ बसस्थानकावर आली असता आरोपीने तिला रस्ता‎ दाखवण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेले होते. तेथे‎ तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याचा धाक दाखवत‎ तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी पीडित‎ महिलेच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी‎ आरोपीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून‎ त्याला अटक केली होती. १० एप्रिल रोजी आरोपीची‎ पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर‎ करण्यात आले असता न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत‎ पोलिस कोठडीत वाढ केली आहे. या प्रकरणाचा‎ तपास ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत.‎