आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन‎:पारस येथे दुर्घटना; मृतांच्या कुटुंबियांची‎ खासदार अरविंद सावंत यांनी घेतली भेट‎

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे (उद्धव‎ ठाकरे) खासदार अरविंद सावंत‎ यांनी मंगळवारी पारस येथे भेट दिली.‎ या वेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांची‎ सांत्वनपर भेट घेत त्यांना शिवसेनेच्या‎ (उद्धव ठाकरे) वतीने सर्वतोपरी‎ मदत करण्याचे आश्वासन दिले.‎ पारस येथे गुरूवारी बाबुजी‎ महाराज संस्थान येथे सायंकाळच्या‎ सुमारास आरती सुरू असताना‎ टिनशेडवर झाड कोसळल्याने सात‎ भाविकांचा दबून मृत्यू झाला होता.‎ तर २९ भाविक जखमी झाले होते.‎

येथील परिस्थितीची पाहणी‎ करण्यासाठी खासदार अरविंद सावंत‎ हे मंगळवारी पारस येथे पोहाेचले. तेथे‎ त्यांनी गावकरी आणि सरपंचांशी‎ चर्चा केली. तर मृतांच्या घरी जावून‎ कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली‎ आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी‎ असून, सर्वतोपरी मदत करण्याचे‎ आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर‎ त्यांनी अकोल्यातील सर्वोपचार‎ रुग्णालयात जावून जखमी‎ असलेल्या भाविकांची भेट घेतली.‎ त्यांना योग्य ते उपचार करण्यासाठीही‎ त्यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना‎ दिल्या. या वेळी त्यांच्या सोबत‎ शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते‎ उपस्थित होते.‎