आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मजुरांना नेणाऱ्या वाहनाचा अपघात; १ ठार, तिघे गंभीर

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्याहून अमरावतीकडे मजुरांना घेवून अकोला-दर्यापूरमार्गे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास खरप येथे घडली.

लसूनने भरलेला एमएच २८ बी ३४९५ क्रमाकांचा ट्रक अमरावतीहून अकोल्याकड़े येत होता. तर अकोल्याकडून दर्यापूरकड़े जाणाऱ्या एमएच ३० बीडी ३८९१ क्रमाकांच्या वाहनामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रमोद उर्फ़ पवन बाबुराव खेडकर (वय २५ रा, चोहोट्टा बाजार, ता. अकोट) असे मजुराचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आणि लागलीच जखमी व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला करून विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

नागरिकांच्या मदतीने उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला करून विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

बातम्या आणखी आहेत...