आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रेल्वे उड्डाणपुलावर अपघात; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अलीकडील रेल्वे उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवर वडिलांच्या मागे बसलेल्या १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात वाहनधारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.शिवणी येथील सुनील शंकरराव वाहुरवाघ हे त्यांची दुचाकी क्रमांक एमएच ३० झेड ८८५१ ने अकोल्यातून शिवणीकडे जात होते. मागे मुलगी पल्लवी बसली होती. रेल्वे उड्डाणपुलावरून जाताना अचानक त्यांच्यासमोरील एका चारचाकी वाहनचालकाने ब्रेक मारल्याने त्यांनीही ब्रेक लावले.

तितक्यात त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला उडवले. त्यात ते खाली पडले तर मुलगी पल्लवी त्यांच्यासमोर फेकल्या गेली. पल्लवीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिच्या डोक्यातून रक्त आले होते. तर वडीलही जखमी झाले होते. त्यानंतर वाहनधारक निघून गेला. रस्त्यावरील लोकांनी दोन्ही बापलेकांना उचलून रुग्णालयात दाखल केले.

तेथे डॉक्टरांनी मुलीला‎ तपासून तिचा मृत्यू झाल्याचे‎ सांगितले. ही घटना १ डिसेंबर‎ रोजी रात्री १० वाजताच्या‎ सुमारास घडली होती. दुसऱ्या‎ दिवशी वडिलांना रुग्णालयातून‎ सुटी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत‎ सुधारणा झाल्याने त्यांनी‎ पोलिसांना बयाण दिले. त्यानंतर‎ पोलिसांनी अज्ञात‎ वाहनचालकाविरूद्ध भादंविचे‎ कलम ३०४ अ, २७९,३३७,३३८‎ नुसार गुन्हा दाखल केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...