आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्ग:तज्ज्ञांच्या मते, स्थिती दिलासादायक; खबरदारीची गरज ; पाच जण रुग्णालयात

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात बुधवार ८ जूनपासून म्हणजे गेल्या ११ दिवसांपासून कोरोनाचे ३१ नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी ११ रुग्णांनी शनिवारी, १८ जूनला कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यःस्थितीत १८ रुग्ण सक्रियआहेत. यातील ५ रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहेत. यातील कुणीही गंभीर नाही. तसेच सद्यःस्थितीत १३ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत अाहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. देशाच्या विविध भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच अकोल्यातही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. सध्या आढळत असलेल्या रुग्णांमध्ये अगदी सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळत असल्याने बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणातून ठीक होत आहेत. शनिवारी डिस्चार्ज देण्यात आलेले ११ रुग्ण गृहविलगीकरणात होते. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी सुरक्षात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्कचा वापर याचे पालन करणे अशा काळात महत्त्वाचे ठरते. याशिवाय अनेक लोकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्याने अगदी सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे सुरक्षात्मक खबरदारीबरोबरच लसीकरणही महत्त्वाचे आहे. डॉ. आदित्य महानकर, वैद्यकीय अधिकारी. अकरा दिवसांतील स्थिती आढळलेले रुग्ण ३१ कोरोनावर मात केलेेले १३ सक्रिय रुग्ण ... १८ दाखल रुग्ण ०५ गृहविलगीकरणात १३ १४६ चाचण्या, एक पॉझिटिव्ह : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४६ अहवाल प्राप्त झाले. त्यात मनपा हद्दीतील महिलेचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात आढळलेल्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्या ६५,२१२ झाली. कोरोनाबाधित रुग्णांमधील लक्षणे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यात सध्या आढळणाऱ्या बाधित रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी किंवा हलका ताप अशी सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळत आहेत. अनेक रुग्णांचा ताप दोन दिवसांच्या औषधोपचाराने बरा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...