आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दोष सुटका‎:लैंगिक अत्याचार व अपहरणाच्या‎ आरोपातून आरोपींची निर्दोष सुटका‎

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना वसाहत येथील एका‎ अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक‎ अत्याचार केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष‎ सुटका करण्यात आली आहे. हा निकाल अतिरिक्त‎ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्या‎ न्यायालयाने दिला. आरोप होता की, १६ ऑगस्ट‎ २०१४ रोजी अल्पवयीन मुलीला आरोपी हरीष‎ दुर्वेकर व पवन गव्हाणे या दोघांनी ती खेळत‎ असताना तसेच फोटो स्टुडिओमध्ये गेल्यानंतर‎ तिचे अपहरण करून तिला रेल्वे स्टेशनवर सोडले.‎

१७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी मनमाड रेल्वे‎ स्टेशनवर रेल्वे पोलिस यांना ही मुलगी सापडली‎ आणि त्यांनी अकोला जुने शहर पोलिस स्टेशनला‎ माहिती दिली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून‎ पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम ३६३, ३६६ भादंवि‎ तसेच कलम ७,८ बालकांचे लैंगिक अत्याचार‎ पासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे दोषारोपपत्र‎ कोर्टात दाखल केले. या प्रकरणामध्ये सरकार‎ पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. या प्रकरणामध्ये‎ बचाव पक्षाच्या उलट तपासणीमध्ये व सबळ पुरावा‎ न सापडल्यामुळे आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात‎ आले. आरोपीतर्फे अॅड. दिलदार खान, अॅड.‎ तिवारी यांनी काम पाहिले.‎

बातम्या आणखी आहेत...