आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात 13 वन्यप्राण्यांची शिकार प्रकरण:आरोपींना जामीन नाकारला; 3 दिवसांची वनकोठडी, आरोपींकडून मौल्यवान वृक्ष प्रजातीही जप्त

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर आलेगाव वनक्षेत्रामधील नैसर्गिक पाणवठ्यामध्ये युरिया टाकून 13 वन्यजीव प्राण्याची शिकार करणाऱ्या आरोपींचा जामिन अर्ज प्रथमश्रेणी न्यायालयाने नामंजूर केला आहे.

आलेगांव वनपरिक्षेत्रा अंतर्गत पिंपरडोळी भाग 2 नियतक्षेत्रातील आरोपींना प्रथमश्रेणी न्यायालयाने जामीन नाकारला आहे. 8 जून रोजी गस्ती दरम्यान वनकर्मचाऱ्यांना 10 माकड, 1 निलगाय, 1 काळवीट व पक्षी मृतावस्थेत दिसून आले होते. यावेळी वनविभागाच्या शोधम मोहिमेमध्ये एका आरोपीच्या शेतामध्ये रक्ताने माखलेले अवजारे आणि दगड सापडले होते. सखोल चौकशीनंतर यात तीन मुख्य आरोपी असल्याचे पुढे आले.

प्रकरणी भारतीय वनअधिनियम तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनीयम अंतर्गत गुन्हे दाखल करुन आरोपींना वनविभागातर्फे तात्काळ अटक करण्यात येवून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची वनकोठडी सुनावली होती. दरम्यान सोमवारी आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होवुन न्यायालयाने आरोपींचा जामीन नाकारुन आरोपी नामे मधुकर कचरु लठाड, गोविंदा इयांगोजी ससाने, संतोष वसंता ससाने यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुढिल तपास अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक के. अर्जुना व सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे यांचे मार्गदर्शनाखाली आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण करीत आहेत.

आरोपींकडून आणखी मौल्यवान वृक्ष प्रजाती जप्त

वनकोठडीतील तपासादरम्यान आरोपीकडून आणखी 1 मृत माकड, रानडुक्कर, पकडण्याचे 3 फासे, वनक्षेत्रातून तोडलेले 6 बांबू नग तसेच साग व अंजन ई. मौल्यवान वृक्ष प्रजाती जप्त करण्यात आल्या. तसेच निलगाय कापण्यासाठी वापरण्यात आलेली कुन्हाडसुध्दा जप्त करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...