आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा‎:अल्पवयीन मुलीचा विनयभंग‎ आरोपीला पाच वर्षांची शिक्षा‎

अकोला‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग‎ केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवून‎ त्याला पाच वर्षे सश्रम कारावासाची‎ शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल‎ गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने‎ दिला.‎ शुभम रामा चांदणे असे शिक्षा‎ ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. १०‎ मे २०२१ रोजी अाराेपीने पीडित मुलीला‎ तिच्या घरातून बळजबरीने नेऊन तिचा‎ विनयभंग केला होता. या प्रकरणी‎ पीडित मुलीच्या तक्रारीवरून जुने‎ शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध‎ गुन्हा दाखल केला होता. पीएसआय‎ वर्षा राठोड यांनी तपासानंतर‎ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले‎ होते.

सरकार पक्षाने एकुण सात‎ साक्षीदार तपासले तर बचाव पक्षातर्फे‎ तीन साक्षीदार तपासण्यात आले.‎ सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून‎ न्यायालयाने आरोपी शुभम रामा‎ चांदणे याला कलम ३५४ भादंवि व‎ पोक्सो कायदा कलम ७, ८ व ४२‎ अंतर्गत दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम‎ कारावासाची शिक्षा सुनावली व पाच‎ हजार रुपये दंड अशी शिक्षा, तसेच‎ दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने‎ साधी कारावासाची शिक्षा सुनावली.‎ तसेच कलम ५०९ भादंवि व पोक्सो‎ कायदा कलम ११(२). १२ अंतर्गत‎ दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम‎ कारावासाची शिक्षा सुनावली व दोन‎ हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड‎ न भरल्यास अतिरिक्त तीन महिने‎ साधी कारावासाची शिक्षा सुनावली.‎ सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी‎ वकील शीतल भुतडा यांनी सरकार‎ पक्षाची बाजू मांडली.‎

बातम्या आणखी आहेत...