आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल‎:तलाठ्याला धक्काबुक्की करणाऱ्या‎ आरोपीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली‎; जिल्हा व सत्र‎ न्यायालयाचा निकाल‎

अकोला‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौण खनीजाने भरलेला ट्रॅक्टर‎ तलाठी यांनी अडवला होता. मात्र‎ त्यांना धक्काबुक्की व लोटपाट‎ करून आरोपी ट्रॅक्टर घेऊन पळून‎ गेला होता. या प्रकरणी आरोपीला‎ दोषी ठरवत जिल्हा व सत्र‎ न्यायाधीश सुनिल एम. पाटील यांच्या‎ न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे‎ सश्रम कारावासाची शिक्षा‎ ठोठावली. हा महत्त्वपूर्ण निकाल‎ शुक्रवारी दिला.‎ शरद अजाबराव सरदार वय ३२‎ रा. गाेरेगाव ता. मुर्तिजापूर असे शिक्षा‎ ठोठावण्यात‎ आलेल्या आरोपीचे नाव आहे.‎

तलाठी नितीन रामदास देसले यांच्या‎ पथकाने अवैध गौण खनिज वाहून‎ नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर २०२०‎ मध्ये कारवाई केली होती. यावेळी‎ ट्रॅक्टरचा मालक शरद अजाबराव‎ सरदार व विनोद अजाबराव सरदार‎ यांनी शासकीय कामात अडथळा‎ निर्माण करून कर्मचारी यांना‎ शिवीगाळ, लोटपाट व धक्काबुक्की‎ करून अवैध खनिजासी ट्रॅक्टर‎ पळवून नेला होता. अशा‎ तक्रारीवरून पोलिसात भादंविचे‎ कलम ३५३,३७९ अंतर्गत गुन्हा‎ दाखल केला होता. पोहेकॉ. गोपाल‎ भवाने यांनी तपास करून‎ न्यायालयात आरोपीविरुद्ध‎ दोषारोपपत्र दाखल केले होते.‎ या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने‎ गुन्हा सिद्ध होण्याकरीता पाच‎ साक्षीदार तपासले.

सरकार पक्षाचा‎ पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने‎ आरोपी शरद अजाबराव सरदार यास‎ भादंविचे कलम ३५३ अंतर्गत दोषी‎ ठरवून दोन वर्षे सश्रम कारावासाची‎ शिक्षा व पाच हजार रूपये दंड अशी‎ शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास‎ अतिरिक्त एक महिने साध्या‎ कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच‎ भादंविचे कलम ३७९ अंतर्गत दोषी‎ ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची‎ शिक्षा व पाच हजार रूपये दंड अशी‎ शिक्षा ठोठावली. या खटल्यात‎ अतिरिक्त सरकारी वकील आनंद‎ गोदे यांनी सरकार पक्षाची बाजू‎ मांडली. तसेच पैरवी अधिकारी‎ नारायण शिंदे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...